संजय खांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दीड लाखांच्या नोटा मोजण्यासाठी डाबकी रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या शाखेने ९७४ रुपये आकारल्याने ग्राहक अवाक् झाले आहेत.या घटनेची गंभीर दखल घेत ग्राहकाने यासंदर्भात तक्रार केली. बँक अधिकाºयांनी नियमावर नियम दाखवून तोंडावर बोट ठेवले आहे; मात्र खासगीत हा नियम ग्राहकांवर अन्याय करणारा असून, राष्ट्रीयीकृत बँकांचे ग्राहक मोठ्या प्रमाणात खासगी बँकांकडे वळत असल्याचे चित्र आहे.जुने शहर परिसरात राहणारे रामदास हरणे व्यावसायिक असून, त्यांनी डाबकी मार्गावरील छाया हॉस्पिटलजवळच्या महाराष्ट्र बँकेतून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्यांनी चार दिवसांपूर्वी बँकेत दीड लाख रुपयांचा भरणा केला. यामध्ये ५००, १००, १० रुपयांच्या नोटांचे बंडल होते.बँक अधिकाºयांनी कर्जाची रक्कम तर स्वीकारली; मात्र कर्ज खात्यात केवळ १४९,०२६ रुपयांचीच रक्कम जमा केली. याबाबत ग्राहक हरणे यांनी विचारणा केली असता, बँक अधिकाºयांनी नोटा मोजण्याची रक्कम आणि त्यावर ‘जीएसटी’ची रक्कम कपात केल्याचे सांगितले. ही रक्कम किती, तर ती ९७४ रुपये असल्याचे उघड झाले. त्यावर ग्राहकाने तक्रार केली असता, बँक अधिकाºयांनी नियमावलीवर बोट ठेवले.दीड लाखांच्या नोटा मोजण्यासाठी जर राष्ट्रीयीकृत बँकांकडून ९७४ रुपये कापले जात असतील, तर हा नियम अन्यायकारक आहे. कर्जावरील व्याजाप्रमाणेच ही रक्कम आहे. त्यात बदल केला पाहिजे, अन्यथा राष्ट्रीयीकृत बँकांच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.- नितीन ताकवाले, बँक ग्राहक,जुने शहर, अकोला.नोटा मोजण्यासाठी सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये रक्कम आकारली जाते. प्रत्येक बँकेचे आपले वेगळे नियम आहेत. भारतीय स्टेट बँकेने तर पाच वर्षांपासून ही नियमावली लावली आहे. त्यामुळे नोटा मोजण्यासाठी आकारलेली रक्कम नियमानुसार आहे. गैरकायदेशीर भाग त्यात नाही.-तुकाराम गायकवाड,जिल्हा लीड बँक व्यवस्थापक, अकोला.कोणत्याही पहिल्या शंभर नोटांसाठी रक्कम आकारली जात नाही; मात्र त्यापुढच्या प्रत्येक बंडलसाठी २० रुपये ग्राहकावर आकारले गेले पाहिजे, असा महाराष्ट्र बँकेचा नियम आहे. त्यासोबत जीएसटीचे १२ टक्के आकारलेल्या रकमेवर वेगळे लावले जातात. तशी तरतूद सॉफ्टवेअरमध्येच आहे. याबाबत नोटिसही लावली गेली आहे, त्यामुळे हरणे यांची ९७४ रक्कम कापली गेली.- बी.के. निमजे, महाराष्ट्र बँक, डाबकी रोड शाखा अकोला.
दीड लाखांच्या नोटा मोजण्यासाठी ९७४ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:22 AM
अकोला : दीड लाखांच्या नोटा मोजण्यासाठी डाबकी रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या शाखेने ९७४ रुपये आकारल्याने ग्राहक अवाक् झाले आहेत.
ठळक मुद्दे ग्राहकाची तक्रार : बँक अधिका-यांचे नियमावर बोट