फिर्यादी पुंडलिक देवलाल अरबट रा. अडसूळ यांच्या तक्रारीनुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तेल्हारा यांनी कलम 156 (3) सीआरपीसी प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये २६ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास उपरोक्त कलमान्वये अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावर खरेदी विक्री संस्थेच्या संचालकानी अकोट येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामीन साठी धाव घेतली होती. संचालक सुरेश साहेबराव ढोले घोडेगाव, सुरेशचंद्र देवराव काळे उकळी, किसनराव साहेबराव बोडखे, वसंतराव साहेबराव बोडखे निंभोरा ,पुंडलिकराव कौतिकराव खारोडे तेल्हारा, प्रकाश हरिभाऊ आढे दापुरा, भुजंगराव बाबाराव दुतोंडे वरुड, सुदेश सीताराम शेळके चांगलवाडी, अनिल मोतीराम कराळे हिवरखेड श्रीराम भिकुजी कुकडे राणेगाव व अनिल नादरे सहा निबंधक सहकारी संस्था, तेल्हारा यांचा समावेश होता.
तसेच पुंडलिक अरबट यांच्या तक्रारीनुसार खरेदी विक्री मधून ६८ हजार ७४१ रुपयांची बनावट बिले काढल्या प्रकरणी न्यायालयात दुसरा अर्ज केला होता. यावर न्यायालयाच्या आदेशानुसार वसंतराव बोडखे, किसनराव बोडखे रा.निंभोरा, मधुकर जायले, अनिल कराळे रा.हिवरखेड, सुरेश ढोले,सुरेशचंद्र काळे, सुदेश शेळके, श्रीराम कुकडे, भुजंगराव दुतोंडे, पुंडलीकराव खारोडे, प्रकाश आढे, प्रभाकर खारोडे, भानुदास चोपडे, उषाताई खारोडे, रामरतन सुशिर, लताबाई चिकटे यांच्याविरूद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४०८, ४७१ सहकलम१२० (ब)नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात खरेदी विक्री संचालकांकडून ॲड. विलास जवंजाळ तेल्हारा व ॲड. सत्यनारायण जोशी अकोला यांनी बाजू मांडली.