अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असून, १४ आॅक्टाबर रोजी दिवसभरात २४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८९८ झाली आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून प्राप्त अहवालातील १८ व नागपूरच्या खासगी प्रयोगशाळेतील सहा अहवालांचा समावेश आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रामदासपेठ येथील तीन, अकोट व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, कान्हेरी सरप, कृषी नगर, शिवनी, हिसपूर ता.मुर्तिजापूर, सागर कॉलनी, संतोष नगर, दहीहांडा ता. अकोट, फडके नगर व छोटी उमरी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी गोकुळ कॉलनी व कैलास नगर येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.३७ जणांची कोरोनावर मातबुधवारी ३७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २५, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, हॉटेल स्कायलार्क येथून दोन अशा एकूण ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.३७४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,८९८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,२६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
Covid-19 : २४ रुग्ण वाढले; ३७ जण बरे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 6:01 PM