संतोष येलकर
अकोला : जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून मतदार जनजागृती कार्यक्रमात मतदार नोंदणी गीताची निर्मिती करण्यात आली असून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शुक्रवारी गीताचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. यावेळी बाळापूर येथील तहसीलदार राहुल तायडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नवमतदारांच्या नोंदणीसाठी दि. ४ व ५ नोव्हेंबरला विशेष शिबिरे होणार असून, स्थानिक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व सर्व पात्र व्यक्तींनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी यावेळी केले.
जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून मतदार नोंदणी गीत जिल्हाधिकारी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. संकल्पना बाळापूरचे तहसीलदार राहुल तायडे यांची असून, निर्मिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर व उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांची आहे. गीत, संगीत, गायन, दिग्दर्शन संघदास वानखडे यांचे असून, गीताच्या व्हीडिओत कलाकार तुळशीदास खिरोडकर यांनी भूमिका वठवली आहे.