अकोला/आकोट: आकोट येथील क्रिकेट सट्टय़ाकरिता बोगस दस्तावेजाद्वारे सिमकार्ड वापरण्यात आल्याचे शनिवारी नरेश भुतडासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिकेट सट्टय़ाकरिता बनावट कागदपत्रे व छायाचित्राचा गैरवापर करून नवीन सिमकार्ड घेण्यात आले. याबाबतची तक्रार संजय ज्ञानदेव मुस्कंडे (रा. बर्फ कारखाना, यवतमाळ) यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून आरोपी नरेश लक्ष्मीनारायण भुतडा, श्याम मधुकर कडू, चेतन महेश जोशी, वीरेंद्र दर्यावसिंग रघुवंशी (सर्व रा. आकोट), बाप्पा इंटरप्राईजेसचा मालक (सावकार पेठ, यवतमाळ) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२0 (फसवणूक), ४६८, ४७१ (खोटे दस्तावेज तयार करणे व खरे असल्याचे भासविणे), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत. भुतडांविरुद्ध तिसरा गुन्हासट्टय़ाप्रकरणी नरेश भुतडांविरुद्ध शनिवारी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला. पहिला गुन्हा १९ मार्च रोजी जुगाराचा दाखल करण्यात आला. त्यानंतर १ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ९ एप्रिल रोजी पुन्हा फसवणूक व बनावट दस्तावेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
क्रिकेट सट्टा: नरेश भुतडाविरूद्ध आणखी एक गुन्हा
By admin | Published: April 10, 2016 1:36 AM