लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवतीचे शहरातील रहिवासी एका युवकाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर आक्षेपार्ह माहिती अपलोड केल्याचा प्रकार मंगळवारी उजेडात आला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी अंकित वानखडे नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वाशिम बायपास परिसरात एक १९ वर्षीय युवती रहिवासी असून, या युवतीचे शहरातील एका युवकाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर खाते उघडले. त्यानंतर या युवतीच्या फेसबुक खात्याच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र अपलोड केले, त्यामुळे वाद होण्याची भीती असल्याने सदर युवतीने या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी सदर खाते उघडणार्या अंकित वानखडे याच्याविरुद्ध ३५४ ड, २९४ आणि ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वानखडे हा कुठला रहिवासी आहे, हे अद्याप समोर आले नसून, सायबर सेलमार्फत त्याचा शोध घेण्यात येत आहे.
युवतीचे बनावट फेसबुक अकाउंट उघडणार्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:54 AM
अकोला : वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवतीचे शहरातील रहिवासी एका युवकाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर आक्षेपार्ह माहिती अपलोड केल्याचा प्रकार मंगळवारी उजेडात आला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी अंकित वानखडे नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देबनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर आक्षेपार्ह माहिती अपलोड केल्याचा प्रकारयुवती वाशिम बायपास परिसरातील रहिवासीजुने शहर पोलिसांनी अंकित वानखडे नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला