अकाेला : सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहीवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अमरावती ग्रामीण पाेलिस दलात कार्यरत असलेल्या एका पाेलीस निरीक्षकाविरुध्द गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
सिव्हील लाइन्स परिसरातील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय मुलीने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २१ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी व तीची चुलत बहीण दोघी स्टेशनरीसाठी बाहेर जात असतांना वाटेत पाेलीस निरीक्षक विजय पाटकर यांनी विनयभंग केला. त्यानंतर मुलगी घाबरल्याने तीने क्षणातच घराकडे धाव घेतली व घडलेला प्रकार आईवडिलांना सांगीतला़ त्यानंतर अल्पवयीन मुलगी आईवडिलांसह पाटकर यांच्या घरी गेली असता पाटकर व त्यांच्या पत्नी व मुलीने जातीवाचक शिविगाळ करीत पाटकर यांनी पोलिस खात्यात ठाणेदार असल्याची बतावणी करीत धमक्या दिल्या़ पिडीत मुलीच्या कुटुंबाला चोरी डकेती, छेडछाड, बलात्कार व ३९२,३९५ सारख्या गुन्ह्यामध्ये अडकवतो व जेलमध्ये सडवतो अशा प्रकारच्या धमक्याही विजय पाटकर यांनी दिल्याचे तक्रारीत नमुद आहे़ या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपी विजय पाटकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अ, ३५४, २९४, ५०६, ३४ आयपीसी सहकलम ११,१२ पोस्को अॅक्ट तसेच अ.जा. अप्र. कायदा २०१५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सिव्हिल लाइन्स पोलिस करीत आहेत.