अकोट: तक्रारदार महिला व तिच्या कुटुंबियांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची धमकी देऊन, सदर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची मागणी करणाºया अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाºयाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार, २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. हशमत खान दाऊदखान पठाण असे या कर्मचाºयाचे नाव आहे.अकोट तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेला तिच्यावर व कुटूंबातील इतर ३ इसम असे चौघांवर फौजदारी कारवाई करण्याची धमकी देऊन सदर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोपटखेड बिटमधील पोहेका हशमत खान दाऊदखान पठाण याने केली. पंरतु मागणी पुर्ण करायची नसल्याने महीलेच्या तक्रारी वरून अकोला एसीबी ने २८ मार्च रोजी पडताळणी केली होती. पंरतु तक्रारदार महीलेवर संशय आल्याने हशमत खान पठाण याने रक्कम स्विकारली नाही. त्यामुळे तो एसीबी पथकाच्या हाती लागला नाही. या प्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनला आरोपी हशमत खान दौलत खान पठाण विरूध्द लाचलुचपत प्रतिबंध कायद्याच्या कलम ७ तसेच भांदवीच्या कलम ३८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असुन, ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले, पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण व इतर कर्मचारी यांनी केली आहे.
महीलेला २० हजाराची मागणी करणाऱ्या पोलीसाविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 4:44 PM