वाडेगाव (जि. अकोला), दि. 0९ : येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा मागील महिन्यापासून ५0 लाखाच्या अफरातफर प्रकरणाचा तास सुरू असताना शनिवारी सकाळपासून पतसंस्थेच्या वेअरहाऊसमधुन धान्याच्या पोत्यांचे मोजमाप करून पंचनाम्याला सुरुवात झाली होती. ही तपासणी सोमवारपर्यंत सुरू होती तर या पतसंस्थेतील वेअरहाऊसमधील धान्याचे पोत्यांचे मोजमाप करून पंचनामा करून तिन्ही गोडावून सील करण्यात आले आहे. तसेच ही चौकशी झाल्यानंतर पतसंस्थेच्या संचालक मंडळ व दोन गोदामपाल सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले.महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे इंदिरानगर वाडेगाव येथे स्वमालकीची तीन गोदामे आहेत. सदर गोडावूनमध्ये वाडेगावसह परिसरातील शेतकरी व व्यापरीवर्गाकडून शेतमाल सुरक्षित राहावा म्हणून आपले धान्य ठेवतात. या गोडावूनमधील दोन गोदामापाल व व्यापारी यांनी संगनमत करून धान्याची अफरातफर करण्यात आली असून यामध्ये संचालक मंडळ भागीदार असल्याचे दिसून आले आहे. अनेक शेतकर्यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला धान्य नसल्याचे तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा निबंधक कार्यालयाच्या चौकशी समितीने चौकशी करून या गोदामात लाखो रुपयाचा घोटाळा असल्याचे घोळ लक्षात आला आहे. या अफरातफर प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक, कर्मचारी व गोदामपाल जबाबदार असल्याचे चौकशी समितीचे अधिकारी एस. मारसट्टेवार यांनी सांगितले आहे. या गोदामावर पोलिसांचा पहारा असून रात्री एकच्या सुमारास पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. यू. के. काळे, उपाध्यक्ष राजेंद्र शेंडे, संचालक प्रीुजी डोंगरे, प्रशांत पल्हाडे, हरिश्चंद्र जावरकर, विश्वनाथ धनोकार, डिगांबर चिंचोळकार, प्रभाकर डोंगरे, गजानन कातखेडे, चंद्रप्रभा चिंचोळकार, आशा घाटोळ, सुमती भुस्कूटे या मंडळासह पतसंस्थेचे व्यवस्थापक श्रीनिवास भालचंद्र चिंचोलकर आणि व्यापारी संतोष बारबुदे, गोदामपाल विजय साबळे, राजेश मसने यांच्यवर भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोन्ही गोदामपालांना अटक करण्यात करण्यात आली आहे. तसेच आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
वाडेगावच्या पतसंस्था संचालकांवर गुन्हे
By admin | Published: August 10, 2016 1:17 AM