अकाेला : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने बुधवारी स्वराज्य भवन येथे ओबीसी आरक्षण बचाओ मोर्चाचे विनापरवाना आयोजन केल्यामुळे माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे यांच्यासह ३०० ते ४०० आंदाेलकांवर सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढला. या माेर्चात प्रकाश तायडे, गजानन म्हसने, महेश गणगणे, शत्रुघ्न बिडकर, श्रीकृष्ण बिडकर, अनिल शिंदे, प्रा . संतोष हुसे, दिनकर वाघ, गजानन वाघमारे, सुभाष सातव, महादेव साबे, रविन्द्र कापने, श्यामसिल भोपळे, महादेव हुरपडे, प्रा. विजय उजवणे, बालमुकुंद भिरड, गजानन इंगळे, शंकर इंगळे, रामकृष्ण साविकर, महादेव मेहेंगे, दिलीप पुसदकर, गणेश इंगोले, रवि हेलगे, देवीदास पोटे, जयंतराव फाटे, प्रवीण ढोणे, योगेश चितोळे, सुनील ढाकोलकर, सदानंद भुस्कुटे, विनोद मिर्गे, बाळाभाऊ टांक, केशव सोनोने, सुरेन्द्र उगले यांच्यासह ३०० ते ४०० मोर्चाकरी सहभागी झाले हाेते. कोविड-१९ मुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ प्रमाणे प्रतिबंध असतानाही महात्मा फुले समता परिषदमध्ये सहभागी आंदाेलकांनी आदेशाचे उल्लंघन करून गैरकायदयाची मंडळी जमविल्याप्रकरणी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न ठेवता कोरोना या साथीच्या राेगाचा फैलाव होईल, असे कृत्य केल्याने त्यांच्याविरुद्ध कलम १८८,२६९ तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम १३५ बी.पी. अक्ट तसेच साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.