लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेऊन यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात नेमून दिलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचे (बीएलओ) काम न केल्याने बी.आर. हायस्कूलमधील सहायक शिक्षक विजय गोटे यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. अकोला तहसीलचे नायब तहसीलदार महेंद्रकुमार आत्राम यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. घरोघरी भेटी घेऊन मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्यासाठीचा कार्यक्रम १५ ते ३0 नोव्हेंबरदरम्यान राबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्या कार्यक्रमाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या कामासाठी अकोला पश्चिम मतदारसंघात बी.आर. हायस्कूलमधील खोली क्रमांक चारसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शाळेतील सहायक शिक्षक विजय गोटे यांची नियुक्ती सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अकोला यांनी केली. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी घेतलेल्या आढावा सभेत गोटे यांनी कामाला सुरुवातच केली नसल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत विचारणा केली असता शाळेचे कामकाज करून मतदारांच्या घरी जाणे शक्य नसल्याचे उद्धट उत्तर दिले. काम सुरू न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी कार्यक्रमाची मुदत संपुष्टात आली. त्या कामाचा अहवालही गोटे यांनी सादर केला नाही. कारणे दाखवा नोटीसचा खुलासा असमाधानकारक असल्याने तसेच कामाचा अहवाल सादर न केल्याने सहायक शिक्षक गोटे यांच्यावर फौजदारी कारवाईची तक्रार १६ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिसांत देण्यात आली. निवडणूक कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने शिक्षक गोटे यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५0 च्या कलम ३२ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये नुसार कारवाई करण्याचे तक्रारकर्ते नायब तहसीलदार आत्राम यांनी यांनी म्हटले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.
अकोला : निवडणुकीचे काम न करणार्या शिक्षकावर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:55 AM
अकोला : मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेऊन यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात नेमून दिलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचे (बीएलओ) काम न केल्याने बी.आर. हायस्कूलमधील सहायक शिक्षक विजय गोटे यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. अकोला तहसीलचे नायब तहसीलदार महेंद्रकुमार आत्राम यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्देतहसीलदारांनी केली सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार