शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

निकष डावलून परजिल्ह्यातील उमेदवाराची निवड!

By admin | Published: June 16, 2016 2:11 AM

वाशिक जिल्ह्यात संरक्षण अधिकारी पदभरती; पात्र उमेदवारास डावलल्याचा आरोप.

सुनील काकडे /वाशिमजिल्हास्तरावरील संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या संवर्गातील पदभरतीसाठी मार्च २0१६ मध्ये झालेल्या परीक्षेत निकष डावलून जिल्ह्याबाहेरील उमेदवाराचा अंतिम निवड यादीत समावेश करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी रोहित यादवच्या आक्षेपांवरून रामदास गोविंदराव वानखेडे या उमेदवाराची नियुक्ती थांबविण्यात आली असून, प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू आहे. जुलै २0१५ मध्ये वाशिम जिल्ह्यात संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानुसार, २७ मार्च २0१६ रोजी २00 गुणांची परीक्षा घेण्यात आली तसेच ११ एप्रिल रोजी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाली. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या संवर्गातील पदे जिल्हास्तरावरील असल्याने जिल्ह्याबाहेरील उमेदवारास प्राधान्य देऊ नये, असे स्पष्टपणे नमूद असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी बु. (ता. दारव्हा) येथील रहिवासी रामदास गोविंदराव वानखेडे या उमेदवाराला नियुक्ती देऊन आपणास डावलण्यात आल्याचा आरोप रोहित यादवने केला आहे. यासंदर्भात रोहितने महिला व बाल विकास विभागाचे पुणे येथील आयुक्त, अमरावतीचे उपायुक्त, परीक्षा ह्यकन्डक्टह्ण करणार्‍या कुणाल आयटी सर्व्हिसेस प्रा.लि. आदींसोबतच शासनाकडे रीतसर तक्रार नोंदवून झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्यास कुठलाच न्याय मिळालेला नाही. बोगस कागदपत्रेरामदास गोविंदराव वानखेडे या उमेदवाराने बोगस कागदपत्रे सादर केल्याचे पुरावे रोहित यादवने गोळा केले आहेत. वानखेडेने ऑनलाइन अर्ज भरताना यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी बु., ता. दारव्हा येथील रहिवासी असतानाही वाशिम शहरातील खोटा रहिवास पत्ता दर्शवून ४४४५0५ या पिनकोडऐवजी ४४४५0१ हा पिनकोड नमूद केला. अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर ४१ टक्के अपंगत्व असताना अर्जात मात्र ५0 टक्के अपंगत्व असल्याचे दाखविण्यात आले. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर महिला व बालविकासच्या उपायुक्तांनी कुणाल आयटी प्रा.लि., पुणे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला; तर परीक्षा ह्यकन्डक्टह्ण करणार्‍या संबंधित एजन्सीने वानखेडेचा अर्ज वाशिम जिल्ह्यातून प्राप्त झाल्यामुळेच त्याचा विचार करण्यात आल्याचे मोघम उत्तर देत हात झटकण्याचा प्रयत्न चालविला असून, पात्र असतानाही आपणांस सोयीस्कररीत्या डावलण्यात आल्याचा आरोप रोहित यादवने केला आहे.दरम्यान, मार्च २0१६ मध्ये झालेल्या संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदभरतीप्रकरणी रोहित यादवच्या आक्षेपांची दखल घेण्यात आली असून, यासंदर्भात आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सोबतच रामदास वानखेडे या उमेदवारास अद्याप नियुक्ती आदेश दिलेले नाहीत. वरिष्ठांच्या निर्देशानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त एम.डी. बोरखडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.