बुलडाणा : १९९९ पासून सुरू असलेल्या ह्यराष्ट्रीय पीक विमाह्ण योजनेचे यावर्षी स्वरूप बदलले असून, २0१६-१७ च्या खरीप हंगामापासून ह्यप्रधानमंत्री पीक विमाह्ण योजना राबविण्यात येत आहे. यावर्षी शेतकर्यांना पीक विमा काढणे सोईचे व्हावे यासाठी ३१ जुलैपर्यंत पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. गत दोन वर्षांपासून दुष्काळात शेतकर्यांना पीक विमा योजना आधार ठरत असल्यामुळे यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेवर पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे. २0१६-१७ च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणून राज्यभर राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार शेतकर्यांना बंधनकारक व बिगर कर्जदार शेतकर्यांकरिता ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज र्मयादेइतकी राहणार आहे. शेतकर्यांना भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगामाकरिता २ टक्के, रब्बी हंगाम १.५ टक्के व नगदी पिकांकरिता ५ टक्के असा र्मयादित ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षीपासून सुरू झालेली पंतप्रधान पीक विमा योजना शेतकर्यांसाठी चांगला आधार देणारी आहे. तसेच पूर, चक्रीवादळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, वीज कोसळणे, कीड व रोग इत्यादी टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळणार आहे. अपुरा, पाऊस, अतवृष्टी आदी संकटामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्यांना लाभ मिळणार आहे. पावसातील खंड, दुष्काळ यामुळे उत्पन्नामध्ये ५0 टक्केपेक्षा जास्त घट झाल्यास नुकसान भरपाईच्या २५ टक्केपर्यंत नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. गत दोन वर्षांपासून पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांना खरीप हंगामात फटका बसत असून, पीक विम्याचा आधार मिळत आहे. त्यामुळे यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेकडे पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांचा सर्वाधिक कल राहणार आहे. असा राहणार पीक विम्याचा लाभ!-पीक विमा योजनेत शेतकर्यांना भरावयाचा हप्ता खरीप ज्वारी जोखीम स्तर ७0 टक्के, विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर २ टक्के व शेतकर्यांना पडणारा विमा हप्ता ४८0 रुपये आहे.-तूर पिकासाठी जोखीम स्तर ७0 टक्के, विमा संरक्षित रक्कम २८ हजार रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर २ टक्के व शेतकर्यांना पडणारा विमा हप्ता ५६0 रुपये आहे.- सोयाबीन जोखीम स्तर ७0 टक्के, विमा संरक्षित रक्कम ३६ हजार रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर २ टक्के व शेतकर्यांना पडणारा विमा हप्ता ७२0 रुपये आहे.- कापूस जोखीम स्तर ७0 टक्के, विमा संरक्षित रक्कम ३६ हजार रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर ५ टक्के व शेतकर्यांना पडणारा विमा हप्ता १ हजार ८00 रुपये राहणार आहे.
३१ जुलैपर्यंत काढता येणार पीक विमा!
By admin | Published: June 27, 2016 2:46 AM