अकोट तालुक्यात वर्ष २०२०-२१ मध्ये अवकाळी पावसामुळे संत्र्याचा मृग बहर गेला म्हणून उमरा मंडलातील, एदलापूर, पिंपरी, खैरखेड येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना संत्र्याच्या नापीकीबाबत निवेदन देऊन, मृग बहराचा विमा जाहीर करा, अशी मागणी केली होती. मात्र उमरा मंडलातील शेतकऱ्यांच्या तोंडाला विमा कंपनीने पाने पुसली आहेत. संत्र्याच्या मृग बहराची नापीकी होत असूनही काही वेगवेगळा विमा देण्यात येत आहे. उमरा मंडलातील संत्रा उत्पादकांना फक्त हेक्टरी १२ हजार विमा जाहीर केला. बाजूलाच असलेल्या बोर्डी मंडलाला ३८ हजार ५०० रुपये हेक्टरी विमा जाहीर झाला. नापीकी सारखीच असून सुद्धा विम्याच्या आर्थिक पुरवठ्यात विषमता का? असा सवाल संतप्त संत्रा उत्पादकांनी उपस्थित केला आहे.
फोटो: