अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून, उन्हाळी भुईमूग पिकासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा काढण्याची अंतिम मुदत १ एप्रिल २०१९ पर्यंत आहे, तसेच कर्जदार शेतकºयांना पीक विमा बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील गहू बागायत, हरभरा, करडई व कांदा पिकांसाठी शेतकºयांनी सहभाग घेण्याची ३१ डिसेंबर २०१८ आहे.कर्जदार शेतकºयांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाईल, तर बिगर कर्जदार शेतकºयांना विहित केलेल्या अर्जात विमा हप्ता विहित कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवर भरावयाचा आहे.अकोला जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी भारती एक्सा जनरल इन्श्युरन्स कं. लि. आहे. या कंपनीत काढण्यात येणार आहे. कंपनीचा दूरध्वनी क्रमांक ०२२-४९१८१५०० असून, टोल फ्री क्रमांक १८००१०३२२९२ आहे. यामध्ये गहू बागायत पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर ३,३००० रुपये आसून, शेतकºयांनी भरावयाचा पीक विमा हप्ता ४९५ रुपये आहे. हरभरा पिकासाठी २,२००० हजार रुपये शेतकºयांना ३३० रुपये पीक विमा हप्ता भरावा लागणार आहे. करडईसाठी १०५०० तर शेतकºयांना १५७.५० रुपये भरावे लागणार आहे. भुईमुगासाठी प्रतिहेक्टर ३,६००० रुपये शेतकºयांना ५४० रुपये भरावे लागणार आहेत. कांदा या पिकासाठी ६,६००० शेतकºयांना भरावयाचा ३,३०० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे.
महसूल मंडळांचा समावेशगहू बागायत व हरभरा ही पिके सर्व तालुक्यात, ५२ मंडळांत अधिसूचित करण्यात आली आहेत. करडई पिकासाठी अकोला तालुक्यातील अकोला, घुसर, दहीहांडा, कापशी, उगवा, आगर, बोरगाव मंजू, शिवणी, पळसो (बु.), सांगळूद, कुरणखेड या मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. उन्हाळी भुईमुगासाठी अकोट तालुक्यातील अकोट, पातूर, बार्शीटाकळी, अकोला, तेल्हारा, महसूल मंडळे, सर्व महसूल मंडळातील अधिसूचित पिके ज्यामध्ये रब्बी कांदा, तालुका- बाळापूर, मूर्तिजापूर, अकोट, पातूर, अकोला, तेल्हारा, महसूल मंडळे आहेत.