- संतोष येलकर
अकोला : खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १ जूनपर्यंत अकोला जिल्ह्यात केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत असून, कर्ज मिळत नसल्याने खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गत १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले; परंतु खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, १ जूनपर्यंत जिल्ह्यात ३ लाख १६ हजार खातेदार शेतकºयांपैकी केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना १३३ कोटी ३८ लाख ५ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. नाफेडमार्फत तूर, हरभरा खरेदी बंद करण्यात आली असून, खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे प्रलंबित असताना, पीक कर्जही मिळत नसल्याने, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व जमीन मशागतीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता सतावत आहे.तीन लाखांवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कर्ज मिळणार?खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप दोन महिन्यांपूर्वी बँकांमार्फत सुरू करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ३ लाख १६ हजार खातेदार शेतकºयांपैकी १ जूनपर्यंत केवळ १४ हजार ३८८ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आले. उर्वरित तीन लाखापेक्षा जास्त शेतकºयांना अद्याप पीक कर्जाचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे खरीप पेरणीपूर्वी जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज मिळणार की नाही, तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.