शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

महिनाभरात पीक कर्ज वाटप २०० कोटींवर!

By admin | Published: May 03, 2017 1:17 AM

कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह

अकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ हजार २०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले, तरी गत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ २०४ कोटी ५० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी उरला असताना, उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या पीक कर्जाचे प्रमाण बघता, खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाळा तोंडावर आल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून, खरीप पेरणीची तयारी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पेरणीसाठी लागणारी बियाणे आणि खतांचा खर्च पीक कर्जातून भागविण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून केले जात आहे. त्यानुषंगाने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या पृष्ठभूमीवर सन २०१७-१८ या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार २०० कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक आणि खासगी बँकांमार्फत गत १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत २७ एप्रिलपर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २०४ कोटी ५० लाख ४६ हजार रुपये पीक कर्जाचे वाटप बँकांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले. पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी उरला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही आणि खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकांकडून असे करण्यात आले कर्ज वाटप!गत महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात बँकांमार्फत २०४ कोटी ५० लाख ४६ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १९३ कोटी ७२ लाख रुपये, राष्ट्रीयीकृत बँका ३ कोटी २० लाख रुपये, ग्रामीण बँक ३ कोटी ८६ लाख आणि खासगी बँकांमार्फत ३ कोटी ७२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.