अकोला : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, जून अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ३३ हजार शेतकºयांना २९३ कोटी रुपयांचे (२१ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. खरीप पेरण्या सुरू झाल्या असून, जिल्ह्यातील उर्वरित १ लाख ४१ हजार ८४७ शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांना पीक कर्ज मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत शेतकºयांना पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. जिल्ह्यात खरीप पेरण्याही सुरू झाल्या; मात्र पीक कर्ज वाटप उद्दिष्टाच्या तुलनेत ३० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३३ हजार शेतकºयांना २९३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १ लाख ४१ हजार ८४७ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा लाभ अद्याप मिळाला नाही. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडला असताना खरीप पेरण्या सुरू झाल्या तरी, पीक कर्जाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक कर्जाच्या लाभापासून अद्याप वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप हंगामातील पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बँकांचा आखडता हात; उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह!यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले; मात्र खरीप पेरण्या सुरू झाल्या तरी, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३३ हजार शेतकºयांना २९३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १ लाख ४१ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार १०५ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाच्या कामात बँकांनी आखडता हात घेतल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे ठरविण्यात आलेले उद्दिष्ट केव्हा पूर्ण होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात जून अखेरपर्यंत ३३ हजार शेतकºयांना २९३ कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. शेतकरी मेळावे पीक कर्ज वाटप तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले आहेत.-डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)