लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत ८१ हजार ६९६ शेतकऱ्यांना ६६१ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ८१ हजार ६९६ शेतकºयांना ६६१ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत २५ हजार ३६६ शेतकºयांना २३७ कोटी ७० लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ४६ हजार ३९० शेतकºयांना ३३२ कोटी ५५ लाख रुपये आणि ग्रामीण बँकेमार्फत ९ हजार ९४० शेतकºयांना ९० कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्या आटोपल्या असल्या तरी उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत ८१ हजार ६९६ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित शेतकºयांना अद्याप पीक कर्जाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत ८१ हजार ६९६ शेतकºयांना ६६१ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले आहेत.- आलोक तारेनियाव्यवस्थापक,जिल्हा अग्रणी बँक