- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकऱ्यांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले आहेत. तसेच कापणीला आलेली ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले. वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आणि पात्या-फुलेही गळून पडली आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकांद्वारे गत ३० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले. जिल्ह्यात १ हजार ६ गावांच्या शिवारात २ लाख ९३ हजार ५८८ शेतकºयांच्या ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापैकी ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमधील २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील १ हजार ६ गावांच्या शिवारात ३ लाख ७६ हजार ४६३ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, अवकाळी पावसाच्या तडाख्यात या सर्व क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस व ज्वारी पीक नुकसानाचा समावेश आहे.
शेतशिवारांत पाणी अन् चिखल; पंचनाम्यांसाठी पथकांची कसरत!सतत बरसणाºया अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतशिवारांमध्ये पावसाचे पाणी आणि चिखल साचला आहे. त्यामुळे शेतांमधील पाण्यातून वाट काढत आणि चिखल तुडवित पीक नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पथकांमार्फत सुरू आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत ६८२ गावांमध्ये २ लाख १७ हजार २५५ शेतकºयांच्या २ लाख ४९ हजार ५0९ हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण केल्यानंतर पीक नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी