अनंत वानखडे
बाळापूर : तालुक्यात आहे. यंदा तुलनेत कपाशीच्या पेरा घटला असून सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. तालुक्याचे एकूण शेती क्षेत्र ६३ हजार ३३७ हेक्टर आहे़ यंदा ६१ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. कपाशीच्या पेरा यंदा काही अंशी घटला असून,. सोयाबीनचे क्षेत्र २६ हजार २२९ हेक्टरवर गेले आहे. सद्यस्थितीत पिके बहरली आहेत ; मात्र गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
यंदा कपाशी १६ हजार ३७५ हेक्टरवर पेरा झाला आहे. तूर १० हजार ६३३, मूग ३ हजार ५०६ तर उडीद ३ हजार ६४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. येथे जुलै अखेर तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात पंचनाम्याची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
--------------
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
तालुक्यात २१ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाने शेत जमिनीचे व पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण २८ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, याचे पंचनामे झाला असून, अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
----------------------------
बाळापूर तालुक्यात खरीप हंगामातील पीक पेरणी
कापूस - १६,३७५ हेक्टर
सोयाबीन २६,२२९ तूर-१०,६३३ मूग ३,५०६ उडीद ३,६४१ ज्वारी ७६१ मका ७४
तीळ ३१
भाजीपाला व इतर २४१ एकूण : ६१,४९१
----------------------------
तालुक्यात अनेक ठिकाणी उत्तम पाऊस आहे. पिके चांगली आहेत. आता पुढील टप्पा म्हणजे औषध फवारणी असणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणते औषध कधी फवारणी करावे, यासाठी कृषी कार्यालयात संपर्क करावा किंवा आपल्या भागातील कृषी सहायकांकडून माहिती करून घ्यावे़
- नंदकिशोर माने, तालुका कृषी अधिकारी, बाळापूर.
--------------------------
पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. सद्यस्थितीत पिके फुलोरावस्थेत असून, फवारणीला वेग आला आहे. फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या पिके बहरली असून, पावसाची प्रतीक्षा आहे.
-गौरव घोगरे, शेतकरी, टाकळी खुरेशी.