लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शाळा-महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, मध्यमवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके घेणे शक्य नाही, त्यामुळे या मुलांच्या पालकांनी आता सेकंडहॅण्ड पुस्तकांसाठी चिवचिव बाजार गाठले आहे. गत आठवडाभरापासून चिवचिव बाजारात गर्दी झाली आहे. सर्वशिक्षा अभियान अंतर्गत अनुदानित शाळांनाच शालेय पुस्तके दिली जातात; मात्र खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नाहीत. अशा मुलांना बाजारपेठेतून नवीन पुस्तके किं वा सेकंडहॅण्ड पुस्तकांशिवाय पर्याय राहत नाही. अकोल्यातील बसस्थानकासमोर हेड पोस्ट आॅफिसच्या जवळ चिवचिव बाजार भरतो. या बाजारात केवळ जुनीच पुस्तके मिळतात. ज्यांना पुस्तके विकायची असतात, ते अर्ध्या किमतीत पुस्तके विकतात. घ्यायची असतात, तेदेखील अर्ध्या किमतीत पुस्तके विकत घेतात. पुस्तकांची स्थिती पाहून त्यांचे दर ठरविले जातात. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब पालकांची सेकंडहॅण्ड पुस्तक खरेदीसाठी चिवचिव बाजारात गर्दी असते.
चिवचिव बाजारात पुस्तकांसाठी गर्दी
By admin | Published: July 17, 2017 3:10 AM