मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती देवरण रोडवरील माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या शेतातील मार्कण्डेश्वर मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिकेय स्वामीची सुरेख व सुंदर संगमरवरी षडमुखी मूर्ती आहे. दरवर्षी कृतिका नक्षत्रात पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी उघडले जाते. रविवारी कृतिका नक्षेत्रात भाविकांसाठी हे मंदिर उघडण्यात आले. त्यावेळी दर्शना करीता हजारो भाविकांनी एकच गर्दी करून दर्शनाचा लाभ घेतला. येथील मंदिरात दरवर्षी आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग २९ नोव्हेंबर रविवार रोजी आला. यानिमित्ताने पंचक्रोशीतल हजोरो भाविक दर्शनासाठी मूर्तिजापूर दाखल झाले. हे धार्मिक स्थळ कानपुरचे नागा निर्वाण महाराज, अक्कलकोटचे श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या व्यासपीठावर विराजमान व चतुर्थ महाराज पुरुष श्री.गजानन महाराज,चिखली चे संत मौनीबाबा,मूर्तिजापुरचे संत बद्रीनाथ महाराज आदीच्या सहवासाने पावन झालेले आहे. तसेच या ठिकाणी मार्कण्डेश्वर मंदिरात महादेवाची पिंड व पिंडीला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्कण्डे ऋषीची संगमरमरी मूर्ती आहे. समोरच यमराज देवतेची काळया पाषाणाची मूर्ती आहे. येथे प.पु.बद्रीबाबा महाराज,प.पु.बँक बाबा महाराज, श्री.बलदेव महाराज, वैध महाराज आदी संताची समाधी आहे. यावर्षी कार्तिक पोर्णिमा ३० नोव्हेंबर सोमवारी आहे. परंतु भगवान कार्तिकेय दर्शनासाठी मुहूर्त २९ नोव्हेंबर रोजी आहे. रविवारी कृतिका नक्षत्रात आल्याने दिवसभर मंदिर दर्शनासाठी उघडल्या गेले. १९४२ मध्ये या मंदिराची निर्मिती असून या मंदिरात तळघर वर्षेभर (भूयार) नैसर्गिक प्रवाहाच्या पाण्याने भरलेले असते. रविवारी मंदिर उघडल्या नंतर त्यातील पाणी बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती दादासाहेब जमादार यांनी दिली. जिल्ह्य़ातील हे एकमेव मंदिर असून यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी साचल्या जात असल्याने मंदिराचे अधिक महत्व आहे. या मंदिराचे विशेष महत्त्व असल्याने मी अकोट येथून सहपरीवार कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी येथे आलो आहे. दर्शन घेतल्या नंतर मन प्रसन्न झाले यापुढे दरवर्षी दर्शनाला आम्ही येणार आहेत.संदीप पाटील, भाविक, अकोट कृतिका नक्षत्र हा दिवस कार्तिक स्वामींचा जन्म दिवस मानला जातो. येथे कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर असल्याने विदर्भातील व इतरही राज्यातून येथे दर्शनासाठी दरवर्षी येतात. या मंदिराचे महत्त्व म्हणजे जिथे कार्तिक स्वामींची मुर्ती आहे ते तळ घर बाराही महिने पाण्याने भरलेले असल्याने याचे विशेष महत्त्व मानल्या जाते.- सुनील शर्माआयोक, कार्तिक स्वामी मंदिर, मूर्तिजापूर
कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हजारो भाविकांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 4:14 PM
Kartik Swami Temple News दरवर्षी कृतिका नक्षत्रात पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी उघडले जाते.
ठळक मुद्देकृतिका नक्षत्रात पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच दर्शनासाठी उघडले जाते. यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग २९ नोव्हेंबर रविवार रोजी आला. यानिमित्ताने पंचक्रोशीतल हजोरो भाविक दर्शनासाठी मूर्तिजापूर दाखल झाले.