लसीकरणाबाबत होत असलेली जनजागृती पाहता, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एकमेव शस्त्र असल्याने नागरिकांची ग्रामीण रुग्णालयात एकच झुंबड उडत आहे. येथे सकाळपासून पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असून ठाणेदार नितीन देशमुख स्वतः हजर राहून देखरेख ठेवत आहेत. याठिकाणी मंडप उभारण्यात आला. परंतु मंडप सुद्धा कमी पडत आहे. ही गर्दी पाहून, अनेक नागरिक लसीकरणाविनाच परत जात आहेत तर काही नागरिक नाईलाजस्तव गर्दीत उभे राहून लसीकरण करत आहेत. मात्र ही गर्दी कोरोना प्रादुर्भाव वाढीसाठी कारणीभूत ठरू नये. शहरात एखाद्या शाळेत किंवा सभागृहात दुसरे केंद्र सुरू केल्यास गर्दीची विभागणी होईल. तसेच केंद्रावर उन्हाची दाहकता बघता पिण्याच्या पाण्याची व खुर्च्यांची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
फोटो: