बसस्थानकावर नियमांचे उल्लंघन
अकाेला : संसर्गजन्य काेराेनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताेंडाला मास्क लावणे, साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची गरज असताना शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे.
अतिक्रमकांच्या हातगाड्यांची ताेडफाेड
अकाेला : महापालिकेच्या सूचनांना केराची टाेपली दाखविणाऱ्या जठारपेठ चाैकातील भाजीविक्रेता, फळ विक्रेत्यांसह इतर साहित्याची विक्री करणाऱ्या अतिक्रमकांच्या हातगाड्यांची मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ताेडफाेड केली. अतिक्रमणामुळे जठारपेठ चाैकात वाहतुकीची काेंडी हाेत असून अनेकदा अपघात घडतात.
लसीकरणासाठी नागरिकांचा पुढाकार
अकाेला : शहरात ६० वर्षांपेक्षा अधिक नागरिकांच्या लसीकरणाला ३ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. सुरुवातीला लसीकरणासाठी आखडता हात घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आता लसीकरणाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. शनिवारी मनपाच्या कस्तुरबा गांधी व भरतिया रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
चाचणीसाठी पुढाकार घ्या!
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचे समाेर आले आहे. शहराच्या प्रत्येक भागात काेराेनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे वैद्यकीय यंत्रणांवर ताण येत असून परिस्थिती लक्षात घेता अकाेलेकरांनी काेराेनासारखी लक्षणे असल्यास चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने शनिवारी केले आहे.
सर्वेक्षणासाठी मनपा सरसावली
अकाेला : मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ हाेत चालली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासन सरसावल्याचे चित्र असून सर्वेक्षणाची माेहीम अंतिम टप्प्यात आहे. चाचणीदरम्यान पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
काेराेनाचे नियम पायदळी
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्याने काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे.
औषधी विक्रेत्यांना मनपाचा इशारा
अकाेला : शहरातील औषधी व्यावसायिकांना नियमित वेळेनुसार व्यवसाय करण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, प्रमुख चाैकांमधील औषध विक्रीच्या दुकानांसमाेर वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा हाेत असल्याचे पाहून मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी शनिवारी दुर्गा चाैक, जठारपेठ चाैकातील औषधी विक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला.