शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

ओळखपत्रांसाठी दुकानदारांची पुरवठा विभागात गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:14 PM

२७ मार्चपर्यंत शहरातील १५० दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत ओळखपत्र देण्यात आले.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुषंगाने ओळखपत्रासाठी शहरातील किराणा व धान्य दुकानदारांची शुक्रवारी जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात गर्दी झाली होती. २७ मार्चपर्यंत शहरातील १५० दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत ओळखपत्र देण्यात आले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार ओळखपत्र मिळविण्यासाठी अकोला शहरातील किराणा व धान्य दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. शुक्रवार, २७ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात ओळखपत्रासाठी दुकानदारांच्या रांगा लागल्या होत्या. २७ मार्चपर्यंत अकोला शहरातील १५० दुकानदारांना ओळखपत्र देण्यात आले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे यांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोला