अकोला/ वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागातील २६ चालकांना रंगअंधत्वाची बनावट प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तथपि, आरोग्य विभागाकडून बुधवारी हे निलंबन रद्द करण्यात आले.अकोला व वाशिम आगारात कार्यरत २६ चालकांनी रंगअंधत्वाची प्रमाणपत्रे सादर करून सुरक्षारक्षकपदावर नियुक्ती मिळविली होती. यापैकी एका चालकास मुंबई येथे वैद्यकीय तपासणीत कोणताही आजार नसल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)
सीएसह चार डॉक्टरांचे निलंबन रद्द
By admin | Published: January 12, 2017 3:59 AM