अकोला - सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात डॉ. दीपिका आशिष संघवी यांनी प्रसूतीसाठी केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाला. यावरून सदर डॉक्टरविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला आहे.खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी खालेदा बी जाफर बेग (३२) या गर्भवती असल्याने त्यांना ४ मार्च रोजी शास्त्री नगरातील डॉ. दीपिका आशिष संघवी यांच्या संघवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिझर न करता नॉर्मल प्रसूती करावी, अशी खालेदा बी यांच्या नातेवाईकांनी डॉ. संघवी यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार डॉक्टर दीपिका संघवी यांनी सायंकाळपर्यंत वाट बघू, असे सांगितले. सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी खालेदा बी यांच्या पोटात बाळ फिरले असल्याचे कारण देत डॉ. संघवी यांनी प्रसूती शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार खालेदा बी यांच्या नातेवाईकांनी त्यांना शस्त्रक्रियेसाठी संमती दिली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र, प्रसूतीनंतर खालेदा बी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संघवी रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या मेमोवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र खालेदा बी यांच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवचिच्छेदन करण्यात आले. एक महिन्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालानुसार प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचे स्पष्ट झाले. या हलगर्जीमुळे खालेदा बी यांच्या शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्यां दोन नस कापल्या गेल्याचे समोर आले. त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले. यावरून सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात डॉ. दीपिका आशिष संघवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसूती शस्त्रक्रियेत हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 3:24 PM
अकोला - सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात डॉ. दीपिका आशिष संघवी यांनी प्रसूतीसाठी केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाला. यावरून सदर डॉक्टरविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देखालेदा बी जाफर बेग (३२) या गर्भवती असल्याने त्यांना ४ मार्च रोजी शास्त्री नगरातील डॉ. दीपिका आशिष संघवी यांच्या संघवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र, प्रसूतीनंतर खालेदा बी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. हलगर्जीमुळे खालेदा बी यांच्या शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्यां दोन नस कापल्या गेल्याचे समोर आले.