लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक रानभाज्या, रानफळे शेतकर्यांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहेत. शेतकरी, नागरिक रानभाज्या, फळे आणि त्यांची उपयुक्तता जाणून घेत आहेत. राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला गडचिरोली हा जिल्हा. आदिवासीबहुल भाग. असल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. योगिता सानप यांनी दिली. कृषी विद्यापीठातील प्रदर्शनामध्ये गडचिरोली कृषी विज्ञान केंद्राने स्टॉल लावला असून, स्टॉलवर विविध प्रकारच्या रानभाज्या, फळे उपलब्ध करण्यात आल्याचे डॉ. योगिता सानप यांनी सांगितले. नागरिकांना पाहण्यासाठी व चव चाखण्यासाठी दुधी, काटे कोहळा, लवकी, नवलकोलू, पामेलो, पोपट वाल, येरोन्या, सांधेदुखीवर अत्यंत गुणकारी असे मटारू, तट्टच्या शेंगा, दुधी भोपळा, बीज केळी, रताळू, पांढरी वाल आदी रानभाज्या, फळे स्टॉलवर उपलब्ध केले आहेत.
मोहाच्या लाडूंचा स्वादच निराळा!गडचिरोली कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दोन बचत गटांच्या स्टॉलवर मोहाचे लाडू उपलब्ध करण्यात आले आहेत. या लाडूंचा आस्वाद मधुर आहे. मोहाचे लाडू शरीरासाठी अत्यंत उष्णता आणि ऊर्जा प्रदान करणारे असल्याने, या लाडूंचा स्वादही नागरिक चाखत आहेत.
गडचिरोलीच्या जंगलात भरपूर रानभाज्या, फळे आहेत. ही निसर्ग संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे जतन व्हावे, यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न आहे. - डॉ. योगिता सानप, शास्त्रज्ञ-