अकोला परिमंडळात कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुली आणि वीज हानी कमी करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या काम करावे, त्यासाठी मीटर रीडिंग एजन्सीच्या नियमित बैठका घ्यावात, ० आणि १ ते ३० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांची काटेकोर तपासणी करावी, तात्पुरता व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेऊन वीज चोरी आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी या वेळी दिले.
थकबाकीवर व्यक्त केली चिंता
थकबाकी वाढत राहिल्यास आगामी काळात महावितरणचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशा परिस्थितीत महावितरण कंपनी टिकवायची असेल तर वीज बिल वसुलीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीज बिल वसुलीत हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
वीज पुरवठा खंडित केलेल्या घरांची पाहणी
प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी थकबाकीमुळे ज्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, अशा काही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. बैठकीस अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अकोला मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे उपस्थित होते.