बाळापूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरण बदलाबाबत ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत बाळापूर नगर परिषदेच्या वतीने १ जानेवारी रोजी सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. प्रदूषण नियंत्रण करण्याच्या हेतूने नागरिकांमधे जागृती निर्माण व्हावी, यासाठी नगराध्यक्ष सै. ऐनोद्दिन खतीब यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. बाळापूर नगर परिषद कार्यालयात उपस्थित नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांनी ‘माझी वसुंधरा’ची शपथ घेतली. त्यानंतर शहरात सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात न. प. कार्यालयातून करण्यात आली. रॅली तहसीलमार्गे बाजारातून ग्रामीण रुग्णालयासमोरून औरंगपुरामार्गे न. प. कार्यालयात पाेहाेचली. समाराेपीय कार्यक्रमात न. प. मुख्याधिकारी जी. एस. पवार यांच्यासह नगरसेवक, सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि अंजुमन हायस्कूल व श्रीमती धनाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
वसुंधरा दिनानिमित्त बाळापुरात सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:19 AM