लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वातंत्र्य दिनानिमित्त एका दुकानमालकाने उदात्त भावनेने सायकल चालवून पर्यावरणाचे रक्षण करणार्या सायकलस्वारांचा व हेल्मेटधारकांचा अनोखा सत्कार केला. त्यांना गुलाबाचे फूल व मोबाइल हॅण्डसेट देऊन स्वातंत्र्य दिनाची भेट दिली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी एक अनोखा उपक्रम घडवून आणला. गांधी रोडवर असलेल्या रितेश मिर्झापुरे आणि त्यांच्या कर्मचार्यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा कार्यक्रम घडवून आणला. सायकल चालवत असलेल्या अकोलावासीयांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सत्कार केला. पर्यावरणाचे खरे संगोपन करणारे तुम्ही आहात अशा शब्दां त त्यांचे स्वागत केले आणि ज्या लोकांजवळ वाहन आहे आणि पूर्ण वाहतुकीचे नियम पाळून ते रस्त्यावर चालतात, त्यात हेल्मेटधारी, गाडीचे पूर्ण कागदपत्र व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणार्यांना मोबाइल हॅण्डसेट भेट दिले.
वाहनधारकांचा सत्कार मधुकर महाले रा. अमळनेर जि. जळगाव, उमेश बी. असवारे रा. अकोला, आदित्य मुळतकर रा. कौलखेड, अब्दुल नजीर अ. बशीर रा. वाशिम बायपास यांना मोबाइल देण्यात आले. उर्वरित वाहनधारकांचा पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.