शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

स्त्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सिलिंडरचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 7:22 PM

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या चहा टपरीवरील गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर या सिलिंडरने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. सिलिंडरचा पूर्णपणे भडका होण्यापूर्वीच आग आटोक्यात आणल्याने, मोठा अनर्थ टळला. सिलिंडरचा स्फोट झाला असता, तर मोठी हानी होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देचहा टपरीवरील सिलिंडरने घेतला पेट; मोठा अनर्थ टळलारमेश शिंदे यांनी दाखविले प्रसंगावधानअतिक्रमकांना अभय कुणाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या चहा टपरीवरील गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर या सिलिंडरने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. सिलिंडरचा पूर्णपणे भडका होण्यापूर्वीच आग आटोक्यात आणल्याने, मोठा अनर्थ टळला. सिलिंडरचा स्फोट झाला असता, तर मोठी हानी होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.‘लेडी हार्डिंग’ म्हणून ओळख असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हाभरातून गरोदर महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच मोठी गर्दी असते. याचाच फायदा घेऊन रुग्णालयाच्या आवारभिंतीलगत किरकोळ व्यावसायिकांनी चहा, नाश्ता, दररोज उपयोगात येणाºया वस्तू आदींची दुकाने थाटली आहेत. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या चहा टपरीवरील सिलिंडरमधून सोमवारी सकाळी अचानक गॅस गळती झाली व बघता-बघता सिलिंडरने पेट घेतला. सिलिंडरची नळी व रेग्यूलेटर पेटल्यामुळे आगीची मोठी ज्वाळाच यावेळी बाहेर पडली. त्यामुळे घाबरलेला चहा टपरी व्यावसायिक व तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तेथून जीवाच्या आकांताने पळ काढला. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरने पेट घेतल्याचे समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांची मोठी धावपळ झाली. रुग्णालय प्रशासनाला ही बाब समजताच भांडारपाल प्रमोद ढेंगे यांनी अग्निशमन दल व रामदास पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत लगतच्या हॉटेल व्यावसायिकाने प्रसंगावधान दाखवून सिलिंडरची आग विझविली. तसेच रुग्णालयाच्या कर्मचाºयांनीही रुग्णालयातील अग्निशमन यंत्राचा वापर केला. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत सिलिंडरची आग विझली होती. रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन सिलिंडर, गॅस शेगडी व इतर साहित्य जप्त केले. रुग्णालयाच्या अधिकाºयांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 

रमेश शिंदे यांनी दाखविले प्रसंगावधान

चहा टपरीवरील सिलिंडरने पेट घेतल्याने लोकांची एकच धावपळ उडाली. चहा टपरी व्यावसायिकानेही तेथून पळ काढला. ही बाब रस्त्याच्या दुसºया बाजूला नाश्ताच्या गाडी चालविणाºया रमेश शंकरराव शिंदे यांच्या लक्षात येताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळावर धाव घेतली. हाताला कापड गुंडाळून सिलिंडरचे रेग्यूलेटर व नळी बाजूला केली आणि सिलिंडर जवळच्या नालीत फेकले. या घडामोडीत त्यांचा हात किरकोळ भाजला; मात्र त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचे  एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

 

अतिक्रमकांना अभय कुणाचे?रुग्णालयाच्या आवारभिंतीला लागूनच किरकोळ व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मनपाच्यावतीने अतिक्रमण काढले जाते; मात्र या ठिकाणचे अतिक्रमण दुसºयाच दिवशी ‘जैसे थे’ दिसून येतात. रुग्णालयातील कर्मचाºयांच्या नातेवाईकांचीच ही दुकाने असल्यामुळे त्यांना हात लावल्या जात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

तीन वर्षांपूर्वीही घडली होती घटनास्त्री रुग्णालय परिसरातील चहाच्या टपरीला आग लागून चार महिला भाजल्याची घटना २०१४ मध्ये घडली होती. भाजलेल्या एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाला होता. यानंतरही येथे सुरक्षेच्या उपायांकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.