लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरात वरली अड्डा चालविणारा तसेच दोन ते तीन वेळा सदर वरली माफियावर विशेष पथकाने कारवाई केल्यानंतरही पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठ्या तोऱ्यात वावरणाऱ्या अकील नामक वरली माफियास विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी चांगलेच झोडपले. या मारहाणीत तो किरकोळ जखमी झाला असून, त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अकोला पोलीस अधक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी काही दिवसांपूर्वी, जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत शकील नामक वरली माफियाच्या वरली अड्ड्यावर छापा टाकला होता. या वरली माफियावर कारवाई केल्यानंतरही तो स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी सोमवारी आला असता त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलीस अधीक्षक कलासागर यांना माहिती दिली. त्यानंतर सदर वरली माफियावर माफक बळाचा वापर केला. वरली माफिया असताना पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन दादागिरी केल्याची माहिती अळसपुरे यांनी दिली.जुने शहरात काढली होती वरातजुने शहरचे तत्कालीन ठाणेदार रियाज शेख यांनी शकील नामक या वरली माफियाच्या गळ्यात पाटी टाकून वरात काढली होती. त्यामुळे हा वरली माफिया वादग्रस्त असून, त्याच्यावर वारंवार कारवाई केल्यानंतरही तो दादागिरी करीत असल्याची माहिती आहे.पोलिसांना भेटण्याचा प्रयत्नवरली माफिया शकील याने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यास भेटण्यासाठी आलो असल्याचे सांगितले आहे. वरली माफिया अशा प्रकारे खुलेआम पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलिसांना भेटण्यामागचे कारण काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सदर पोलिसाने त्याला कशासाठी बोलावले, या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
दादागिरी करणाऱ्या वरली माफियास झोडपले!
By admin | Published: July 13, 2017 1:25 AM