अकोला : बाळापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका इसमास चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून राेख रकमेसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथील रहिवासी रमाबाइ जानराव इंगळे यांनी बाळापूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना चाेरट्यांनी अडवून त्यांच्याकडील राेख रकमेसह पाच लाख रुपयांचे दागिने पळविले हाेते. त्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपींचा शाेध सुरू केला असता, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेष सपकाळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी उमेश दयाराम दंदी वय २२ वर्ष रा. कोळासा ता. बाळापूर, राष्ट्रपाल ऊर्फ जणु सुखदेव सिरसाठ वय ८0 वर्ष राहणार - रमाबाई आंबेडकर चौक, भीमनगर जुने शहर यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चाैकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पाेलिसांनी त्यांच्याकडून १00 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ४ लाख ९७ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. या आराेपींना बाळापूर पाेलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चव्हाण, सागर हटवार, जयंत सोनटक्के, सदाशिव सुळकर, प्रमोद डाेईफोडे, अश्विन मिश्रा, शक्ती कांबळे, किशोर सोनोने, शेख वसिम,अब्दुल माजिद, मो. रफी, एजाज अहमद, रवि इरचे, अनिल राठोड, अविनाश मावळे व सायबर येथील गणेश सोनोने व नीलेश बाटे यांनी केली आहे.