कार्यक्रम समारोप प्रसंगी डॉ. प्रशांत वासनिक अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान मपमविवि नागपूर, डॉ. नितीन मार्कंडेय सहयोगी अधिष्ठाता परभणी व डॉ. संतोष शिंदे हे उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमात किफायतशीर मुक्त संचार गोठा, मुरघास निर्मिती, प्रजनन व्यवस्थापन, रोगनियंत्रण, एकात्मिक पशुपालन, टाकाऊपासून टिकाऊ व मूल्यवर्धित दुग्ध पदार्थ आदी विषयांवर सुप्रसिद्ध पशुतज्ज्ञ डॉ. शैलेश मदने, डॉ. चंद्रप्रकाश खेडकर, डॉ. साईनाथ भोकरे, डॉ. विजय केळे, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. आरीफ शेख, डॉ. संदीप रिंधे, डॉ. वैभव लुल्ले, डॉ. अभय कुलकर्णी व मुकुंद गिरी यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील ५० नवउद्योजक, शेतकरी, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक, सुशिक्षित बेरोजगार युवक व महिला यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहसमन्वयक डॉ. दिलीप बदुकले, डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. मोहिनी खोडके, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. मंगेश वड्डे व डॉ. नरेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.