अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेली ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना गेल्यावर्षीप्रमाणे आताही पावसाळ््यातच बंद पडत आहे. पाणी पुरवठा होणाऱ्या उन्नई बंधाºयातील पाणी आटले आहे. योजनेतील गावांना पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी महान धरणातील पाणी नदीपात्रातून सोडण्यात यावे, या मागणीचे पत्र पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्णयानंतर पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.खांबोरा येथील उन्नई बंधाºयात असलेला जलसाठा दोन दिवसात संपुष्टात येत आहे. त्यामुळे ६४ खेडी प्रादेशिक योजनेतील गावांचा पाणी पुरवठाही बंद होणार आहे. गेल्या वर्षीही आॅगस्टमध्ये उन्नई बंधाºयातील पाणी आटले होते. त्यानंतर अवलंबून असलेल्या खारपाणपट्ट्यातील ५५ पैकी ४४ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. लगतच्या काळापर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. काही दिवसांपूर्वी उन्नई बंधाºयात पाणी आल्याने योजनेचा पुरवठा सुरू झाला. काही दिवसातच उन्नई बंधारा आटला आहे. परिणामी, योजना दोनच दिवसात बंद पडणार आहे. योजनेतील गावांना पाणीपुरवठा सुरू राहावा, यासाठी पाटबंधारे विभागाने महान धरणातील पाणी नदीपात्रातून सोडावे, या मागणीचे पत्र जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सोमवारी दिले. त्यावर जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या आदेशानंतर पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
उन्नई बंधारा आटला, ६४ खेड्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 6:13 PM
अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेली ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना गेल्यावर्षीप्रमाणे आताही पावसाळ््यातच बंद पडत आहे.
ठळक मुद्देखांबोरा येथील उन्नई बंधाºयात असलेला जलसाठा दोन दिवसात संपुष्टात येत आहे.त्यामुळे ६४ खेडी प्रादेशिक योजनेतील गावांचा पाणी पुरवठाही बंद होणार आहे.