-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात ६-७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्यावर शेतीवरील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाच्या हवाल्या नुसार ४४३ हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात कहर केला आहे अनेक गावात घरात पाणी शिरले तर पावसामुळे ३४ घरांची पडझड झाली आहे. नदी - नाल्यांना पुर आल्याने त्या काठावरील जमीन पाण्याखाली आल्याने पीकाचे नुकन झाले आहे. त्याच बरोबर इतर महसूल मडळातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला बांध घातले आहेत अशा शेतकऱ्यांची शेती सुरुवातीपासूनच तुंबलेली आहे, शेतीच्या बांधमुळे शेतातील पाणी वाहून जात नसल्याने शेताला तलावाचे स्वरुप आल्याने पीके पाण्याखाली आली असल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष तपासणी करावी व शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ७०० हेक्टरच्यावर शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 17:09 IST