- संतोष येलकरअकोला : गत जुलै ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांत ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले असून, पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत २७ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.गत जुलै व आॅगस्ट २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुषंगाने कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या पथकांमार्फत पीक नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे दोन्ही तालुक्यांतील १२७ गावांमध्ये ७ हजार ५४६ शेतकऱ्यांचे ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन्ही तालुक्यांतील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.दोन तालुक्यांतील असे आहे पिकांचे नुकसान!तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)अकोट ५२२० ३३३३.४२तेल्हारा २३२६ १५४६.८३......................................................एकूण ७५४६ ४८८०.२५३.३१ कोटी रुपये मदत निधीची मागणी!अकोट व तेल्हारा तालुक्यातील पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३ कोटी ३१ लाख ८५ हजार ७०० रुपये मदत निधीची मागणीही जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली आहे.२४२ हेक्टर जमीन खरबडून गेली!जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांत अतिवृष्टी व पुरामुळे २४२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यात १४३.८ हेक्टर आणि तेल्हारा तालुक्यात ९८.१४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. असेही पीक नुकसानासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.