अकोला : अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात नुकसान झालेल्या १० हजार २३६ घरांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पंचनाम्यांसंदर्भात आक्षेप असल्यास संबंधितांनी गुरुवार, दि.२९ जुलैपर्यंत संबंधित तहसीलदार कार्यालयात आक्षेप नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मंगळवारी केले. जिल्ह्यात २१ ते २३ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे घरांच्या नुकसानांसंदर्भात जिल्ह्यातील ४२६ बाधित गावांपैकी २९९ गावांतील घरांच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आहे. त्यानुसार नुकसान झालेल्या घरांची संख्या १० हजार २३६ आहे. त्यामध्ये अंशत: नुकसान झालेल्या घरांची संख्या ९ हजार ९६५ असून, पूर्णत: नुकसान झालेल्या घरांची संख्या २७१ आहे. दरम्यान, घरांच्या नुकसानाचे करण्यात आलेल्या आलेल्या पंचनाम्यासंदर्भात आक्षेप असल्यास संबंधितांनी संबंधित तहसीलदार कार्यालयात २९ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
घरांचे नुकसान; पंचनाम्यांवर २९ जुलैपर्यंत नोंदविता येणार आक्षेप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:20 AM