- संतोषकुमार गवईशिर्ला (अकोला): पातुर नगरपरिषद च्या लालमातीच्या मैदानावर महाराष्ट्रातील अनेक पहेलवानांनी कुस्ती लढवली; मात्र वाशिमच्या आठ वर्षीय आयुषी गादेकर ने शिरपूर च्या रहिमला ‘चारो खाने चित’करून आमीर खानच्या ‘दंगल’ या हिंदी चित्रपटातील 'मारी छोरीया,किसी छोरो से कम है के' या ‘डॉयलॉग’ ची आठवण करून दिली.औचित्य होते संभाजी ग्रुपचे अध्यक्ष कैलासभाऊ बगाडे तथा मंडळाच्या यूवा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कुस्तिच्या फडाचे. या फडासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून पैलवान आले होते. दर्शनी सामन्यासाठी वाशिम येथून आलेल्या आयुषी गादेकर हिने कुस्ती खेळण्यासाठी नोंदणी केली. एवढ्याशा चिमुकलीसोबत कोन लढणार म्हणून, कोणीही समोर येत नव्हते. अखेर शिरपूरच्या रहिमने हे आव्हान स्विकारले. मैदानात दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. परंतु, चिमुकली आयुषी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या रहिमला भारी पडली आणि तीने त्याला पटकणी देऊन उपस्थितांची वाहवा मिळविली.कुस्तीच्या या रणसंग्रामाचे उद्घाटन आमदार बळीराम सिरस्कार यांनी केले. नगरपरिषदेचे गटनेते सय्यद बुरहानभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास पातुरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.सी खंडेराव, नगरपरिषद उपाध्यक्ष राजू ऊगले,अधिकारी.अ.भा.मराठी पत्रकार परिषद पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, दिपक झापे,चंदू वस्ताद, अभिजित भारती, भोजराज बायस, संजय शिरसाट, यांची प्रमुख उपस्थिती होती.कुस्तीच्या महारणसंग्रामात अंतिम लढतीत कारंजाच्या वसिमला पराभूत करून वाशिमच्या ज्ञानेश्वर पहेलवानाने दुसरा क्रमांक पटकावला, कोल्हापूर च्या तेजस खेलवी ला पराभूत करून कोल्हापूरच्या डिगांबर पहेलवानाने तृतीय क्रमांक पटकावला,वाशिमच्या रामदास जाधव पहेलवान चौथ्या बक्षिसा चा मानकरी ठरला,तर पाचव्या बक्षिसाची अंतिम लढत शिरपूर च्या शाहरुख पहेलवानाने जिंकलीविजेत्या पहेलवानाना आयोजक संभाजी ग्रूपचे अध्यक्ष कैलास भाऊ बगाडे यांचे वतीने नगरपरिषद गटनेते मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. कुस्तीच्या महारणसंग्रामाचे संचालन सागर कढोणे, आभार प्रदर्शन चंदू बारतासे,क्रिष्णा बोंबटकार, यांनी केले स्पर्धेचे यशस्वी आयोजनासाठी गणेश गाडगे, राहुल वाघमारे,जीवन ढोणे, सचिन गिर्हे,नितीन बारतासे, सागर कढोणे,चंदू बारतासे आदि शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अनेक वर्षांनंतर प्रथमच पातुरमध्ये कुस्तीच्या महारणसंग्रामाचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी ग्रुप च्या विशेष उपक्रमामुळे कुस्ती रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
पातुरात ‘दंगल’: आठ वर्षीय आयुषीने तीच्यापेक्षा मोठ्या रहिमला केले ‘चारो खाने चित’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 3:04 PM
शिर्ला (अकोला): पातुर नगरपरिषद च्या लालमातीच्या मैदानावर महाराष्ट्रातील अनेक पहेलवानांनी कुस्ती लढवली; मात्र वाशिमच्या आठ वर्षीय आयुषी गादेकर ने शिरपूर च्या रहिमला ‘चारो खाने चित’करून आमीर खानच्या ‘दंगल’ या हिंदी चित्रपटातील 'मारी छोरीया,किसी छोरो से कम है के' या ‘डॉयलॉग’ ची आठवण करून दिली.
ठळक मुद्देराज्यभरातील पैलवानांची पातुरात मांदियाळी वाशिमच्या ज्ञानेश्वर पहेलवानाने दुसरा क्रमांक पटकावलासंभाजी ग्रुप च्या विशेष उपक्रमामुळे कुस्ती रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.