अकोला : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनानुसार कडक ‘लॉकडाऊन’ पाळल्यानंतर, सरकारने काहीबाबतीत नियम शिथिल केले. लॉकडाऊनमध्ये रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली. सरकारी कर्मचाऱ्यांची मर्यादीत संख्याही कामाचा व्याप पाहून कमी जास्त होऊ लागली त्यामुळे नागरिक व कर्मचारी अशा गर्दीमुळे सध्या सरकारी कार्यालय फुलले आहेत. यामुळे सरकारी कार्यालयात येणाºया अभ्यागतांची संख्या वाढली. कामासाठी रांगा लागायला लागल्या, गर्दी वाढली. ही गर्दी पुन्हा कोरोना संक्रमणाचे कारण ठरण्याची चिन्हे आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प. परिसरात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ला बगल!जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक कार्यालयात आणि कार्यालयासमोर तसेच जिल्हा परिषद परिसरात नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक कार्यालयात आणि कार्यालयासमोर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नाही.जिल्हा परिषदेतील पंचायत विभागासमोरील उपहारगृह परिसरात नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि जिल्हा परिषद परिसरात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन होत असून, बहुतांश नागरिकांकडून तोंडावर मास्क व रुमालचा वापर करण्यात येत असला तरी, काही जणांकडून मात्र यासंदर्भात उल्लंघन करण्यात येत असताना, संबंधित यंत्रणांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
पंचायत समितीमध्ये नियमांचे उल्लंघन!पंचायत समिती कार्यालयात येणाºया नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियामांचे उल्लंघन करण्यात आल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. तर काहींनी मास्कचा उपयोगही केला नसल्याचे चित्र दिसून आले. तालुकास्तरावरील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी अनेकांची पंचायत समितीमध्ये ये-जा सुरू आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची गर्दी होत असून, त्यांच्याकडून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियामांचे पालन होताना दिसत नाही. शिवाय, मास्कचाही उपयोग केल्याचे दिसत नाही. बाहेरच चहा विक्रेत्यासोबतच वाहन दुरुस्तीचे दुकान असून, या ठिकाणीदेखील लोकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही. थुंकण्यास बंदी असूनही काही लोक रस्त्यावरच थुंकत असल्याचेही गुरुवारी निदर्शनास आले.
रुग्णांमध्ये कोरोनाची भीती; तरी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ नाही!कोरोनाविषयी भीती असल्याने बहुतांश रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात जाण्यास टाळत आहेत. अत्यावश्यक असेल तरच क्वचित रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जात आहेत. शिवाय, मास्कही लावत आहेत; परंतु फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात दिसून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नॉन कोविड रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात जाण्यास टाळत असल्याने येथील रुग्णसंख्या केवळ १० टक्क्यांवर आली आहे. तर तीन दिवसांच्या लॉकडाऊनंतरही नॉन कोविड रुग्णांनी सर्वोपचार रुग्णालयात जाण्यास टाळल्याचे गुरुवारी दिसून आले. अत्यावश्यक उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णांनी मास्क चा वापर केल्याचे आढळून आले; परंतु, कोरोनाची भीती असूनही फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. विशेषत: उपचाराच्या प्रतीक्षेत रांगेत उभे असलेल्या रुग्णांमध्ये हा प्रकार दिसून आला.