अकोला: जिल्'ात कोरोनासोबतच व्हायरल फिवर अन् डेंग्यूचाही धोका वाढला आहे. कोरोना काळात जिल्'ात डेंग्यूच्या २१ रूग्णांची नोंद झाली असून नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.जिल्'ात कोरोनाचा कहर सुरू असताना इतर आजाराचे रूग्ण कमी आढळून येत असल्याचा समज अनेकांमध्ये आहे. त्यामुळे बेफिकरी वाढत असून नागरिक इतर आजारांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, हा प्रकार आरोग्यासाठी धोकादायक असून, इतर आजार डोके वर काढू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल फिवर सोबतच डेंग्यूचाही धोका वाढला आहे. मागील सहा महिन्यांमध्ये जिल्'ात डेंग्यूचे २१ रूग्ण आढळले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत हा आकडा काही प्रमाणात कमी असला, तरी कोरोना काळात हा आजार धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी बेफिकरी न करता वेळीच सावध होऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. रूग्णांनाही डेग्यूचा धोका डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. मात्र, सर्वोपचार रूग्णालय परिसरात रूग्णांच्या नातेवाईकांकडून होणारी अस्वच्छता, व नाल्यांची नियमीत स्वच्छता होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थित येथे दाखल रूग्णांनाही डेग्यूचा धोका सतावतो आहे.
ही घ्या खबरदारी
- पाण्याची भांडी नियमीत स्वच्छ ठेवा
- घराचा परिसर स्वच्छ ठेवा
- आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा
- स्वच्छतागृहांची नियमीत सफाई करा
- उकळलेले पाणी प्या
- नियमीत व्यायाम करा
मागिल सहा महिन्यांमध्ये जिल्'ात डेंग्यूच्या २१ रूग्णांची नोंद करण्यात आली. कोरोना काळात कुठल्याही लक्षणांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये.
- डाँ. आदित्य महानकर, जिल्हा हिवताप अधिकारी,अकोला