शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

८ हजार ‘फ्रंट लाइन’ वर्कर्सचा कोरोना लसीकरणासाठी ‘डाटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 11:32 AM

संपूर्ण डाटा ३ ऑक्टाेबरला शासनाला पाठविण्यात येणार आहे.

अकाेला : कोरोना संसर्गाशी सर्वांत पुढच्या फळीत लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम कोरोनाची लस देण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील ‘फ्रंट लाइन वर्कर्स’चा डेटा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या शासकीय व खासगी अशा एकूण ८ हजार १४ कर्मचाऱ्यांची माहिती गुरुवारपर्यंत संकलीत करण्यात आली हाेती. संपूर्ण डाटा ३ ऑक्टाेबरला शासनाला पाठविण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीसाठी सर्वत्र अहमहिका सुरू आहे. जी कोणतीही लस पहिल्यांदा उपलब्ध होईल, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेत शासकीय व खासगी स्तरावरील ‘फ्रंट लाइन वर्कर्स’ची माहिती ३१ ऑक्टोबरच्या आत मागितली आहे. या अनुषंगाने महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हा आरोग्य यंत्रणा कामी लागली असून, अधिनस्थ यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच आयएमए व तत्सम संघटनेशी संलग्न यंत्रणेतील सर्व व्यक्तींची माहिती संकलन करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे लशींचा साठा ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज, लसीकरण करण्यासाठीचे केंद्र आदी तयारी या निमित्ताने सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्य विभागाद्वारे २३ ऑक्टोबर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र देऊन या मोहिमेची माहिती व महत्त्व विशद केले आहे. प्रत्येक जिल्ह्याची काय तयारी सुरू आहे, यासाठी प्रधान सचिवांनी व्हीसीद्वारे आढावादेखील घेतला.

यांचा पहिल्या मोहिमेत समावेश

एएनएम, एमपीडब्लू, आशा, आशा पर्यवेक्षक, स्टाफ नर्स, हेल्थ सुपरव्हायझर व सुपरव्हायझर, आयुष, शलोपॅथी डॉक्टर्स, डेंटिस्ट, मेडिकल, नर्सिंग, पॅरामेडिकल आणि इतर विद्यार्थी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपी, रेडिओलॉजिस्ट, टेक्निशियन, आरोग्य यंत्रणेतील ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, क्लरिकल व प्रशासकीय स्टाफ यांची वर्गवारी करण्यात येऊन त्यांची सविस्तर माहिती त्यामध्ये भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी जी लस उपलब्ध होणार आहे, ती ‘लाइव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सीन (जिवंत लस) या प्रकारातील असल्याचे सांगण्यात आले. ती कोठून उपलब्ध होणार, याविषयी आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. कोरोनावरील लस भारतात २०२१ च्या सुरुवातीला उपलब्ध होणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच केलेले आहे. भारतात दोन लसींच्या मानवी चाचण्या सुरू झालेल्या आहेत, तर रशियानिर्मित लसीच्या चाचण्यादेखील देशात लवकरच सुरू होतील.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या