शिवसेना वसाहत येथे घडले होते हत्याकांड
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथे पार्वताबाई गंगावणे यांच्या अंगावर पेटलेले कापड फेकून त्यांना जाळून मारल्याप्रकरणी त्यांची सून व सुनेची आई या दोघींना प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. या दोघींना दहा मार्च रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
शिवसेना वसाहत मधील बजरंग चौक येथील रहिवासी पार्वताबाई गंगावणे (वय ६५) या २२ ऑक्टोेबर ी२०१३ ला घरासमोर असताना त्यांची सून मंगला रत्नाकर गंगावणे व मंगलाची आई शोभा मुळे यांनी पेटलेले कापड पार्वताबाई गंगावणे यांच्या अंगावर घे
फेकले होते. त्यामुळे पार्वताबाई या ५५ टक्के जळल्या होत्या. नागरिकांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. २१ नोव्हेंबर रोजी पार्वताबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी मृत्युपूर्व बयाणात सून मंगला गंगावणे मंगलाची आई शोभा मुळे यांनी पेटलेले कापड अंगावर फेकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचे बयाणात नमूद केले होते. यावरून जुने शहर पोलिस ठाण्यात मंगला गंगावणे व शोभा मुळे यांच्याविरद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४, ०, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयात झाली. यादरम्यान मृत पार्वताबाईचा मुलगा व मुलगी न्यायालयात फितूर झाले; मात्र तत्कालीन तहसीलदार व तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरल्याने मायलेकींना न्यायालयाने सोमवारी दोषी ठरविले आहे. या दोन्ही आरोपींना बुधवार १० मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.