वणी रंभापूर हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर वसलेले असल्याने व सदरच्या गाव परिसरात कंपनी, पीकेव्हीचे कर्मचारी, मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात ये- जा करत असून गावच्या नागरिक यांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याचे दिसत आहे.
गाव परिसरात सर्दी, खोकला, तापाची लागण असणाऱ्या नागरिकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गावातील खाजगी दवाखान्यात गर्दीत वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड तपासणी केली तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येतील, अशी चर्चासुद्धा नागरिकांत आहे. तेव्हा संबंधित आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी यांनी गावातील दुकानदार यांची कोरोना तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचा आदेशसुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी काढला असल्याने वणी येथील संबंधित विभागाने या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.