अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे प्रती डॉ. इंदुप्रकाश गजभिये (७१) यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होता.डॉ. इंदुप्रकाश गजभिये यांनी राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सेवा दिली असून, वयाच्या ५८ व्या वर्षी ते नागपूर येथील आयजीएमसी येथून सेवानिवृत्त झाले. गत काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मृत्यूशी झुंज देत असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. मीनाक्षी गजभिये, मुलगा डॉ. अनुज, मुलगी डॉ. द्रुमदला असा आप्त परिवार आहे.
वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या पतीचेही कोरोनाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 9:28 AM