अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. रविवार, ११ आॅक्टाबर रोजी अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५५ वर गेला आहे. रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३ व रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये नऊ, असे एकून २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८१७ झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १५९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये पैलवाडा येथील दोन जणांसह निंबा, भीम नगर, गजानन नगर, खडकी, केशव नगर, किसरा कॉलनी, बाळापूर, वाल्मिकी नगर, बाळापूर नाका, कापसी ता. पातूर व जीएमसी क्वॉर्टर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
मुंडगाव येथील वृद्धाचा मृत्यूरविवारी मुंडगाव, ता. अकोट येथील ७८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना ५ आॅक्टोंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
७७ जणांना डिस्चार्जरविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १९, ओझोन हॉस्पीटल, अकोला अॅक्सीडेंट क्लिनिक, सुर्यचंद्र हॉस्पीटल, हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी एक, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले ५४ अशा एकूण ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
रॅपिड चाचण्यांमध्ये ९ पॉझिटिव्हशनिवारी दिवसभरात झालेल्या १११ रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १८९४० चाचण्यांमध्ये १३६७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
५१५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,८१७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,०४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५१५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.