अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी बाळापूर तालुक्यातील पारस येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २८५ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,७७७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये केशवनगर येथील आठ, शिवचरण पेठ येथील तीन, सहकार नगर, कान्हेरी सरप, गजानन पेठ, शास्त्री नगर, खदान, सिंधी कॅम्प, उमरी, पातूर नंदापुर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.पारस येथील एकाचा मृत्यूमंगळवारी पारस ता. बाळापूर येथील ६६ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मुत्यू झाला. त्यांना ९ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.१६ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, त्हॉटेल रिजेंसी येथून एक अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३३९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,७७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८१५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३३९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
आणखी एकाचा मृत्यू; २० पॉझिटिव्ह, १६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 17:40 IST