अकोट येथील पुरुषाचा मृत्यू
शनिवारी अकोट येथील ६८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये सात पॉझिटिव्ह
शनिवारी झालेल्या एकूण १५९ रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २६,६९२ चाचण्यांमध्ये १८५६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
१९ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
७४२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८६१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८८१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७४२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ७८७६ १८०१ १७७=९८५४
मयत-३०२
डिस्चार्ज-८८१७
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-७३५